Download Video and Audio from YouTube

माझा विशेष | आघाडीच्या ट्रॅकवर मनसेचं इंजिन?

123,591 views 1,268 186

आगामी लोकसभा निवडुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप विरोधात महाआघाडीसाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्यासाठी चर्चा झडत आहेत. त्यातच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मनसेला युतीत सहभागी करुन घेण्याचा प्रस्ताव काँग्रेससमोर ठेवलाय. या प्रस्तावावर काँग्रेसकडून अद्याप सहमती दर्शवण्यात आलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखण्यासाठी महाराष्ट्रात नवी राजकीय समीकरणं दिसण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज ठाकरे यांची जवळीक वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर युतीच्या चर्चांना उधाण आलंय.. ग्रामीण भागात नसली तरी मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिक या भागात मनसेची पकड मजबूत आहे. त्यामुळे शहरांमध्ये मनसेची साथ महत्वाची ठरेल, अशी आशा राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे.

Comments